आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:परतूरला शुक्रवारी कवी दासू वैद्य यांची मुलाखत व बालकवी संमेलन होणार

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस ( ता.मंठा) चे संस्थापक अध्यक्ष स्व.दत्तात्रय हेलसकर यांचा सातवा स्मृतिदिन शुक्रवारी आहे. स्मृतिदिनी परतूर येथे कवी, साहित्यिक तथा गीतकार दासू वैद्य यांची मुलाखत, विनोद शिरसाठ यांचा संवाद, बालकवींचे कविसंमेलन होणार आहे.

परतूर येथील विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालना यांच्या संयुक्त सहकार्याने स्व.दत्तात्रय हेलसकर स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन परतूर येथे करण्यात आले आहे. अभिवादन कार्यक्रमास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी भाषा विभागप्रमुख, कवी, साहित्यिक तथा गीतकार डाॅ.दासू वैद्य यांची मुलाखत प्राचार्य डाॅ.सुधाकर जाधव हे घेणार आहेत. साने गुरुजी यांनी सुरू केलेले “साधना’ साप्ताहिक ७५ व्या वर्षात वाटचाल करीत आहे. यानिमित्त संपादक विनोद शिरसाठ संवाद साधणार आहेत.

अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद सेवा केंद्राचे अध्यक्ष डॉ. एस.जी. बाहेकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संदीप बाहेकर, हेलस कथामाला शाखेच्या अध्यक्षा कल्पना दत्तात्रय हेलसकर, साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते, प्रमुख कार्यवाह आर.आर.जोशी, कार्याध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष डाॅ.दिगंबर दाते, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, विजय वायाळ, बाबासाहेब हेलसकर, संतोष मुसळे, डाॅ.यशवंत सोनुने, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमानंतर अभिनेते, गीतकार विनोद जैतमहाल यांच्या अध्यक्षतेखाली बालकवींचे कविसंमेलन होईल.

या कविसंमेलनात अदिती जोशी, नेहा उबाळे, अनुश्री तोटकर, वेदांत लोमटे, दिव्या जाधव, शांभवी देशमुख, सार्थक पाठक, संस्कृती सिरसाट, रोहिणी शेरे, वैष्णवी मुसळे, संपत शेरे यांचा सहभाग असेल. साहित्यप्रेमी, रसिक, वाचकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शिंदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील खरात, रामदास कुलकर्णी, संदीप इंगोले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...