आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठार:अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार  ठार

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना परतूर - आष्टी महामार्गावरील मोरे पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी रात्री घडली. उद्धव माणिक चव्हाण (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सुरुमगाव येथे चव्हाण दिवसभर आपल्या मुलांबाळासोबत ऊसतोड करून परत आपल्या गावी हास्तूर तांडा येथे दुचाकी (एमएच २१ बी एल ०३१५) ने रात्री आठ वाजेदरम्यान परतत होते. दरम्यान, मोरे पेट्रोल पंपासमोर येताच समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. त्याच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मृताच्या मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि. शिवाजी नागवे यांच्या आदेशाने मुंडे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...