आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी शिबिर:दाभाडीत आनंद दिघे पुण्यतिथी निमित्त नेत्र तपासणी शिबिर

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष, श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, समाजभान टीम, गणपती नेत्रालय व लोकप्रिय हॉस्पिटल यांच्या संयुक्त घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात ४८८ जणांची मोफत तपासणी करण्यात आली. उद्घाटन मुख्यमंत्री सहायता मदत कक्षाचे अधिकारी मंगेश चिवटे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा प्रमुख दादासाहेब थेटे यांच्यासह आदी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी बदनापूर तालुका प्रमुख दिपक भुजंग, डॉ असीम खान मुलतानी, व्यापारी महासंघ अध्यक्ष पवन जैवाळ, श्रीकांत ढगे, शिवाजी ठाकूर, दिनेश पघळ, पांडे, महेश देशमुख, गजानन म्हसलेकर, मुद्दासिर मुलतानी, संदिप बकाल, दिपक पिंपळे, जयराम भेरे, दिनेश भेरे, अंबादास मुजमुले, तारेख शेख, रेहान शेख, शाकीब सिद्दीकी, हारून सय्यद, दुर्गा बकाल, निर्मला कांबळे, आशा रगडे, शकुंतला पवार, सरपंच अदनान सौदागर, ग्रामसेवक विनोद भुजंग, गणेश भेरे, फारुक काझी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. मुद्दसीर मुलतानी यांनी, तर संदीप ओळेकर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...