आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून भीम फेस्टिव्हल,‎ दानवे यांच्या हस्ते उद्घाटन‎‎:आनंद शिंदे, वैशाली माडे यांची उपस्थिती राहणार‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२‎ व्या जयंतीनिमित्त जालन्यात ६ व ७‎ एप्रिल रोजी भीम फेस्टिव्हलचे‎ आयोजन करण्यात आले आहे. यात‎ भीमगीतांचा कार्यक्रम होणार असून ६‎ एप्रिल रोजी प्रख्यात गायक आनंद‎ शिंदे, तर ७ रोजी वैशाली माडे या‎ फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण असणार‎ आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे‎ अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी दिली.‎ या उपक्रमाची माहिती देण्यासाठी‎ मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित‎ करण्यात आली होती.

या वेळी अध्यक्ष‎ मनोज पांगारकर यांच्यासह महासचिव‎ संजय इंगळे, अॅड. बी. एम. साळवे,‎ अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, सुनील साळवे,‎ सुधाकर निकाळजे, शिवराज जाधव‎ आदींची उपस्थिती होती. अंबड‎ चौफुली येथील जांगडे पेट्रोल‎ पंपाजवळ असलेल्या मैदानावर‎ सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम‎ होणार आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब‎ दानवे यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे‎ उद्घाटन होईल. पालकमंत्री अतुल‎ सावे, आमदार कैलास गोरंट्याल,‎ बबनराव लोणीकर, माजी मंत्री अर्जुन‎ खोतकर, आमदार संतोष दानवे,‎ नारायण कुचे, राजेश राठोड, भास्कर‎ अंबेकर, भास्कर दानवे आदींची‎ उपस्थिती असणार आहे.‎