आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील एसटीच्या चारही आगारांत १ एप्रिलपासून ६३० वाहकांच्या हाती अँड्राॅइड तिकीट यंत्र येणार आहे. यामुळे सुट्या पैशांवरून होणारे वाद तसेच नेहमी बंद पडणाऱ्या यंत्रापासून वाहकांची सुटका होणार आहे. विशेष म्हणजे एटीएम, डेबिट कार्ड, फोनपे, गुगलपे, यूपीआय, क्यूआर वापरता येणार आहे. नागरिकांच्या प्रवासाची धमनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीने आता डिजिटल सेवेकडे वळण घेतले आहे. यात तिकीट यंत्राची भर पडली आहे. एसटीचा प्रवास करताना सुट्या पैशांसाठी वाहक व प्रवासी यांच्यात नेहमीच वाद होतात.
ही समस्या सोडवण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने १ एप्रिलपासून अँड्रॉइड मशीन देण्याचे नियोजन केले आहे. मशीनमुळे प्रवाशांना तिकिटाची रक्कम थेट ऑनलाइन देता येणार आहे. बदलत्या काळासोबत चालण्यासाठी आता एसटी महामंडळानेही एक पाऊल पुढे टाकत तिकिटांसाठी सर्व वाहकांना अँड्राइड मशीन देण्याचा कॉन्ट्रॅक्ट खासगी कंपनीला दिला आहे. अँड्राॅइड मशीनमध्ये एटीएम, डेबिट कार्ड, फोनपे, गुगलपे, यूपीआय, क्यूआर कोड वापरून एसटीचे तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना वाहकास सुटे पैसे देण्याची अडचण असते. अशा वेळी वाहकासोबत प्रवाशांची वादावादी होते. अनेकदा वाहक सुट्ट्या पैशांसाठी तिकिटावर लिहून देत पुन्हा पैसे घेणे, एसटीतून खाली उतरताना तिघा-चौघांत एकत्रित पैसे देणे यांसारखे प्रकार करतात. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. बदलत्या काळानुसार एसटीची सेवाही बदलावी, या हेतूने एसटी एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार आता एसटीमध्ये १ एप्रिलपासून वाहकांना तिकिटासाठी अँड्राॅइड यंत्रे दिली जाणार आहेत. यंत्रांच्या कंपन्या आणि स्टेट बँकेच्या सहकार्याने डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशीन्स वापरात आणण्यात येणार आहेत.
एप्रिल महिन्यापासून एसटीत होणार यंत्रणा कार्यरत
विदर्भ, मराठवाडा, खान्देश अशा सर्व ठिकाणी हे अँड्रॉइड यंत्र दाखल होणार आहे. जालना जिल्ह्यात ६३० यंत्रांची मागणी असून ती पूर्ण केली जाणार आहे. -प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.