आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर्स हे पृथ्वीवर देवदूत आहेत. अनुचित प्रसंगी डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णालयाची नासधूस दुर्दैवी असून रुग्ण व नातेवाइकांनी भावना बाजूला ठेवत डॉक्टरांना दोष न देता संयम राखावा, असे आवाहन रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन व आयएमए जालना यांच्या वतीने जनजागृती अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपप्रांतपाल डॉ. सुमित्रा गादिया, आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजीव जेथलिया, सचिव डॉ. श्रेयांस गादिया, अॅड. सविता मोतीपवळे, मिडटाऊनचे अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत, प्रशांत बागडी यांची उपस्थिती होती. डॉ. मोतीपवळे यांनी अॅड. महेश धन्नावत यांच्या नेतृत्वाखाली जालना रोटरी मिडटाऊनने वर्षभरात घेतलेले लोकोपयोगी उपक्रम, ज्वलंत समस्या, विविध प्रश्नांवर राबवलेली जनजागृतीची चळवळ नवी दिशा देणारी आहे, असे नमूद केले. डॉ. सुमित्रा गादिया यांनी कायदेविषयक प्रबोधनामुळे अनुचित घटनांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला. अॅड. महेश धन्नावत यांनी आपल्या रुग्णांसोबतच अन्य रुग्णसुद्धा उपचार घेत आहेत, याचा विचार न करता रागाच्या भरात नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ले, इस्पितळांची नासधूस करणे असे प्रकार घडतात. कायद्यात शिक्षेच्या तरतुदी असल्या तरी त्याविषयी माहिती नसल्याने पुढे अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, अनुचित प्रकार होऊ नये, डॉक्टरांना निर्भयपणे सेवा करता यावी याकरिता सर्व इस्पितळांत फलकांद्वारे जागृती केली जात असल्याचे सांगितले. या वेळी डॉक्टर्स, आयएमए व रोटरी मिडटाऊनचे पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.