आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी प्रयत्न:तीन शिरा ब्लॉक असलेल्या वृद्धेची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया; डॉ. कृष्णा कोरडे यांचे यशस्वी प्रयत्न

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन नसा शंभर टक्के तर एक नस ९९ टक्के ब्लॉक झाल्याने एका ८२ वर्षीय वृद्ध महिलेला हृयविकाराचा तीव्र झटका आला होता. अशा गंभीर स्थितीत जालना शहरातील ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा कोरडे यांनी दीपक हॉस्पिटलमध्ये किचकट अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वी करीत त्या वृद्ध महिला रुग्णाच्या तिन्ही शिरांमध्ये तीन स्टेनचे यशस्वी रोपन केले.

बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द येथील लक्ष्मीबाई नंदू ढाकणे (८२) या ज्येष्ठ महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ९ मे रोजी जालना शहरातील दीपक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कुलभूषण मराठे यांनी महिलेवर प्रथमोपचार करून तपासण्या केल्या. संबंधित महिलेच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख तीन नसांमध्ये ब्लॉक असल्याचे दिसून आले. यात दोन नसा शंभर टक्के तर एक नस ९९ टक्के ब्लॉक होती.

अहवाल पाहिल्यानंतर ह्रयरोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कोरडे यांनी डॉ. संजय राख यांच्या मार्गदर्शनाखाली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. वाढलेले वय आणि इतर शारीरिक त्रासामुळे बायपास शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याने रुग्ण महिलेसह नातेवाईकांना विश्वासात घेऊन अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय योजनेतून १० मे रोजी संबंधित महिलेच्या तिन्ही ब्लॉक असलेल्या शिरांमध्ये तीन स्टेनचे रोपन करण्यात आले. एकाच वेळी तीन नसांमध्ये तीन स्टेन टाकण्याची ही शस्त्रक्रिया डॉ. कृष्णा कोरडे, डॉ. कुलभूषण मराठे, भूलतज्ज्ञ डॉ. मिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी केली. दोन दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...