आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:"लम्पी'बाबत पशुपालकांनी भीती बाळगू नये ; डॉ. सिद्दिकी यांचा शेतकऱ्यांना सल्ला

​​​​​​​जामखेड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यात लम्पी या विषाणूजन्य जनावरांच्या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव काही ठिकाणी झाला आहे. त्यामध्ये जामखेड परिसरात काही पशूधन लम्पी बाधीत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या आजाराची लक्षणे म्हणजे अगोदर तीव्र ताप येणे तसेच नाका तोंडातून पाणी येणे नंतर आठवडाभरात अंगावर फोड येतात,पायाला सूज येते व जनावरांना अत्यंत वेदना होतात. यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते, परंतु वेळेवर औषध उपचार केले, तर यावर नियंत्रण करता येते. लम्पीला टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य उपचार व डॉक्टरांच्या सल्ल्याने पशूधन सुरक्षीत ठेवता येते, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम. सिद्दीकी यांनी दिली.

अंबड तालुक्यातील जामखेड येथे लम्पी आजाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबत शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत जामखेड परिसरात सतरा-अठरा जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यामध्ये सर्व जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. देशी जनावरांमध्ये याचा प्रादूर्भाव कमी होताना दिसत आहे. खबरदारी म्हणून उपाय योजना करणे आवश्यक आहे. लम्पीचा प्रादूर्भाव डास, माशा तसेच गोचीडाच्या माध्यमातून होतो. प्रादूर्भाव टाळण्यासाठी जनावरांच्या गोठ्यात व परिसरात दोन टक्के हायपोक्लोरेटची फवारणी करण्यात यावी, यासाठी ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. जामखेड व परिसरातील जनावरांच्या खरेदी-विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली आहे. तसेच आठवडी बाजारात सुध्दा पशुधन नेऊ नये, नाहीतर गुन्हे दाखल होऊ शकतात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...