आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:भाव नसल्याने फुलशेतीत सोडले जनावरे; झेंडूच्या फुलाला बाजारात अल्प दर, केलेला खर्चही निघेना

धावडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील देविदास राघो कोथळकर या शेतकऱ्याने एक एकर झेंडु फुलशेती केली माञ बाजारपेठेत फुलांना मागणी नसल्यामुळे बेभाव विक्री होत आहे त्यामुळे खर्च परवडत नसल्याने वैतागून या तरूण शेतकऱ्याने फुलशेतीत आपली गुरेढोरे, बकऱ्या सोडल्या.

येथील शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग घेत शेती करतात बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा फुलशेती केली. माञ बाजारपेठेत झेंडु फुलाना मागणी नाही. या शेतकऱ्याने एका एकरात झेंडु फुले लावली यासाठी त्याना जवळजवळ एक लाख रूपये.खर्च आला माञ ऐण फुल बहरले असताना माञ बेभाव विक्री होत आहे.

मी नेहमी फुलशेती करत आलेलेा आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे फुलांना मागणी नव्हती यावर्षी तसेच झाले सद्या बाजारपेठेत झेंडु फुलाना मागणी नसल्याने बेभाव विक्री होत आहे नाईलाजाने फुलशेतीत जणावरे सोडावी लागली, असे शेतकरी देविदास कोथळकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...