आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व कथेतील पात्र हे सामान्य लोकांचे आहेत. त्यांचे साहित्य वाचतांना ते कल्पीत कथा न वाटता आपल्या आजु-बाजुला घडलेल्या घटना वाटतात. त्यांचे सुखःदुख वाटतात. महाराष्ट्रात संत, महापुरुष, समाजसुधारक यांचा वारसा लाभलेला आहे. आजच्या तरुण पिढीने या सर्वच महापुरुषांची चरित्र्य, साहित्य वाचले तर त्यांचे मार्ग कधीच भरकटणार नाहीत, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले. जालना शहरातील जवाहर बाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गरजु विद्यार्थ्यांांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजयकुमार पंडीत, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, दिपक रणनवरे, किशोर कदम, माजी गटशिक्षण अधिकारी
बी. के. बोरुडे, किशन लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, थोर समाजसुधारकांनी दिलेले विचार अंगीकारले तर प्रत्येकाच्या जीवनाचे कल्याण होईल व त्याचीच गरज आज आहे. चौका - चौकात बसून आपला संबंध नसतानाही अनेक राजकीय घडामोडी यावरील चर्चेत वेळ घालविण्यापेक्षा जर आपण महापुरुषांची चरित्र्य वाचली तर तुमचे जीवन समृध्द होईल असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
एवढी ताकद या साहित्यात असल्याचे अंबेकर म्हणाले. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीच्या आयोजित करण्यात आलेल्या शालेय साहित्य कार्यक्रमास रविकांत जगधने, संतोष खंडागळे, श्रावण ससाने, पवन वाघमारे, फारुख, कचरु मिसाळ, धोंडीराम आडगळे, प्रदीप सराटे, किशोर कदम, किशन दांडगे, अनिस, मुस्ताक, बंडू निकाळजे, जफार,अरुण गाडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.