आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाभाऊ साठे जयंती साजरी:अण्णा भाऊंनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली;  माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांचे प्रतिपादन

अंबड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जागतिक दर्जाचे साहित्यिक असून त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे काम केले आहे. ते लेखक तर होतेच त्याचबरोबर शिवशाहीर, गिरणी कामगारांचे नेते देखील होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे कार्य आहे. या थोर महापुरुषांचे साहित्य समाजाने वाचले पाहिजे. मातंग समाजाला क्रांतीगुरु लहुजी साळवे आणि अण्णाभाऊंचा मोठा वारसा आहे तेव्हा येणाऱ्या काळात समाजाने प्रमाणिकपणे काम करावे मातंग समाजाला राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी दिली.

अंबड शहरात विविध उपक्रम रावबून अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यात समाज भूषण पुरस्कार, गुणवंताचा सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदींचा समावेश होता. यावेळी आमदार टोपे बोलत होते. व्यासपीठावर संजय इंचे, अॅड.अफरोज पठाण, प्रमोद कांबळे, अर्जुन भोजने, काकासाहेब कटारे, सतिष देशपांडे, अशोक डोरले, संदीप खरात, चंद्रकांत दिलपाक, ॲड. विद्यासागर डावणगावकर, ॲड. साळवे, ॲड. आशा गाढेकर, प्राचार्य पंडित, भागवत कटारे, बुंदेलखंडे, सतिष खरात, प्रकाश नारायणकर, नाजीम शेख, मुन्ना खरात, मोहसीन हाश्मी, निलकंठ सुरंगे, गणेश पाऊलबुदे, अशोक साळवे, गोपी घायाळ, महेंद्र खरात, राहुल खरात, गणेश पाचारे , मुन्ना खरात आदी उपस्थित होते. यावेळी मातंग समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते भारत जाधव, रविंद्र कारके, शिवाजी घुले, विठ्ठल तुपसौंदर, अंबादास जाधव, सुनील खुळे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन चंद्रकांत कारके यांनी तर मंगेश कारके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद शिरगोळे, राहुल कारके, राजू जाधव, अनिल खुळे, साळीकराम बाळश्राप, लक्ष्मण उघडे, दिपक पिसूळे, भीमराव तांबे, शाम साळवे, विशाल पवार, महेश जाधव, प्रमोद कारके, निलेश जाधव, रायभान सुतार, आदित्य कारके, किशोर कारके, ईश्वर जाधव, अभिजीत शिरगोळे, संघर्ष कांबळे, सचिन सुतार, दिशांत कांबळे, संजय निर्मळ, सुखानंद निर्मळ, रमेश सोनवणे, विलास तांबे, भगवान जाधव आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...