आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:भोकरदन शहरात वार्षिक क्रीडा स्पर्धेस झाला प्रारंभ

भोकरदन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जनविकास शिक्षण संस्था संचलित पायोनियर इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल जोमाळा- भोकरदन मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. उद्घाटन कन्या केंद्रीय शाळेचे केंद्रप्रमुख आर.एच. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख होते.

सोनवणे म्हणाले, या संस्थेच्या सर्व शाळेचे विद्यार्थी हे शिक्षणा बरोबर क्रीडा व इतर क्षेत्रात ही अग्रेसर असुन संस्थेचा नावलौकीक करण्यामध्ये पुढे आहे. त्याचप्रमाणे पायोनियर सीबीएसई स्कूल, श्री गणपती इंग्लिश/मराठी हायस्कूल, स्व अॅड. भाऊसाहेब देशमुख मराठी विद्यालय चे विद्यार्थी हे सर्व ठिकाणी अग्रेसर असतात. क्रीडा स्पर्धेची सुरुवात ध्वजारोहण व मशाल पेटवून करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, पी. बी. रोजेकर, लता गायके, प्राचार्य जे. आर. सपकाळे, आर. आर. त्रिभुवन, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, साळुबा लोखंडे, क्रीडा शिक्षक सुरेश भोसले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...