आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:अनोखाच्या महाप्रसादास पोलिस अधीक्षकांच्या हस्ते झाला शुभारंभ

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य संग्रामात भारतीयांना संघटीत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा जपली जात आहे. या उत्सवात सर्व समाज घटकांना सामावून घेत राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत करावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील अनोखा गणेश मंडळातर्फे आयोजित महाआरती व महाप्रसादाचा शुभारंभ शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मंडळाचे संस्थापक जगदीश भरतीया, अध्यक्ष जगदीश मुंदडा, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव गौरीशंकर देवीदान, उपाध्यक्ष सुदर्शन मुंदडा, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम भक्कड, राजकुमार दायमा, गणेश तिवारी, बबलू सारस्वत, रोहित भुरेवाल, अतुल मंत्री, राजेश अग्रवाल, निलेश राठी, कैलाश मेघावाले, गणेश भुरेवाल, दीपक गिल्डा, अभय अग्रवाल, सचिन पाटनी, महावीर मरलेचा, हर्षद चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या सर्व जालनेकरांना शुभेच्छा देत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत व सामाजिक ऐक्य राखत साजरा करावा आणि पोलीस प्रशासनास सहकार्य कराव,े असे आवाहन जालन्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...