आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक वैभव:अनोखा गणेश मंडळाने सांस्कृतिक वैभव निर्माण केले : आ. राजेश टोपे

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक बांधिलकीतून स्थापन झालेल्या अनोखा गणेश मंडळाने लक्षवेधी ,आकर्षक देखावे, भाविकांना प्रसाद, लहान बालकांना खेळणे, अशा सुविधा उपलब्ध करून देेेत मनोरंजनासह जालन्यातील गणेशोत्सवात सांस्कृतीक वैभव निर्माण केले, असे गौरवोद्गार माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील अनोखा गणेश मंडळातर्फे रविवारी महाआरती व सत्कार प्रसंगी आमदार टोपे बोलत होते.

या वेळी मंडळाचे संस्थापक जगदीश भरतिया, अध्यक्ष जगदीश मुंदडा, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव गौरीशंकर देवीदान, उपाध्यक्ष सुदर्शन मुंदडा, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम भक्कड, राजेश अग्रवाल ( रूपम), निलेश राठी, आनंद भक्कड, आलोक गोरंट्याल, जयप्रकाश सुरा, राहुल हिवराळे, बबलू सारस्वत, गणेश तिवारी, रोहित भुरेवाल, अतुल मंञी,गणेश भुरेवाल, दीपक गिल्डा, अभय अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार राजेश टोपे यांनी गत सात वर्षांपासून आपण अनोखा च्या आरतीस येत असून मंडळाचे उपक्रम प्रत्यक्ष अनुभवत आहोत.

बातम्या आणखी आहेत...