आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामायणात जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, येथे बंधू प्रेमाचा आदर्श पाहायला मिळतो, तुलसी रामायण आणि राम चरित्र मानस हे धर्मग्रंथ भारतीय संस्कृतीचे प्रतीके आहेत. राम कथेमध्ये सहभागी होणे म्हणजे जणू काही मान सरोवरांमध्ये स्नानाचा आनंद घेण्यासारखे आहे, असे रामायणाचार्य रामराव महाराज ढाेक यांनी सांगितले.
भोकरदन तालुक्यातील वाकडी येथे जगद्गुरू तुकोबाराय बीज व नाथषष्ठी उत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीरामकथा सोहळा सुरु आहे. ढाेक महाराजांनी रामायण ग्रंथ महात्म्य व शिवपार्वती विवाह या विषयावर कथा प्रवचन केले. रामायण हा भारतीय संस्कृतीतील अमूल्य ठेवा आहे. रामायण वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्या सात जन्माचे पाप नाहीसे होते. आजच्या धावपळीच्या जगात तर संपूर्ण रामायन वाचणे किंवा ऐकण्यासाठी वेळ नसतो. यासाठी खाली दिलेल्या एका श्लोकाचे योग्यप्रकारे जप केला तर संपूर्ण रामायण वाचण्याचे किंवा ऐकण्याचे फळ मिळते.
याला एक श्लोकी रामायण असेही म्हणतात. श्रीराम वनवासात गेले, तेथे स्वर्ण मृग (हरीण)चा वध केला. वैदही म्हणजे देवी सीतेचे रावणाने हरण केले, रावणाकडून जटायूचा मृत्यू झाला. श्रीराम आणि सुग्रीवाची मैत्री झाली. बलीचा श्रीरामांनी वध केला. समुद्र पार करून लंका दहन केले. त्यानंतर कुंभकर्ण आणि रावणाचा वध केला. ही रामायणाची संक्षिप्त कथा आहे. असे रामराव महाराज ढोक सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेश वंदना करण्यात आली. यावेळी सामुदायिकपणे आरती करण्यात आली. दरम्यान या कथेत सितास्वंयवर, केवट कथा, सिताहरण, लंका दहन, रावण वध, श्रीराम राज्याभिषेक या कथा सांगितल्या जाणार आहेत. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती.
सप्ताहात यांचे कीर्तन
वाकडीत सुरु असलेल्या अखंड हरीनात सप्ताहात अॅड. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, प्रकाश महाराज साठे, ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलूदकर, समाधान महाराज भोजेकर, गजानन महाराज वरसाडेकर, बाळु महाराज गिरगावकर, युवाचार्य संतोष महाराज आढावणे यांचे कीर्तनसेवा होणार आहे. भाविकांनी या सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.