आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व:रोलर स्केटिंग स्पर्धेत अनुष्का घोगरे प्रथम, विभागीय पातळीवर करणार नेतृत्व

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी जालना कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२- २३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत रोलर स्केटिंग वयोगट अकरा मध्ये २१ नोव्हेंबर रोजी ग्लोबल गुरुकुल स्कूल जालना येथे आयोजित जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत अनुष्का कैलास घोगरे प्रथम आली.

यानंतर ती विभागीय पातळीवर खेळणार आहे. त्याबद्दल तिचा जैन इंग्लिश स्कूल अंबड येथे सत्कार करताना शाळेचे मुख्याध्यापक सिद्दिकी, क्रीडा शिक्षक फईम, व जरांगे, वाघमारे आदी शिक्षकांची उपस्थिती होती. तिच्या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...