आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एपीएल शेतकरी:एपीएल धान्य कोटा देण्यात यावा

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून एपीएल शेतकरी कार्डधारकांना धान्य देण बंद करण्यात आले आहे. पण सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बघुन एपीएल शेतकरी कार्डधारकांना नियमित धान्य कोटा लवकर देण्यात यावे, अशी मागणी युवा सेना उपजिल्हाप्रमुख राम लांडे यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे सामान्य शेतकऱ्यांचे हाल झाले असुन हातातील पिके गेली आहेत. स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिवाळी किट देण्याचा प्रयत्न करुन सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. परंतु एपीएल शेतकरी कार्डधारकांना नियमित धान्य कोटा मिळाला नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या एपीएल शिधा पत्रिकेचा अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करुण तीन रुपये किलो तांदूळ व दोन रुपये किलो गहू या सवलतीच्या दराने एका कुटुंबाला प्रति महिना जास्तीत जास्त २५ किलो धान्याचा लाभ देण्यास पात्र ठरविले होते, मात्र एपीएल शेतकरी कार्डधारकांना गहू, तांदूळ नियतन शासनाने दिलेले नाही.

त्यामुळे शेतकरी लाभार्थींची गैरसोय होत आहे. जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पिकांची वाढ खुंटली आहे तर सोयाबीनचे फुलगळ झाली आहे त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देवुन मदत करावे तसेच एपीएल शेतकरी कार्डधारकांना शेतकऱ्यांना नियमित धान्य कोटा लवकर देण्यात यावे, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...