आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेचा लाभ:ठिबक, तुषार सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजनांतर्गत सुक्ष्म सिंचन योजना ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी ९० टक्के अनुदान देण्यात येत असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन https://mahadbtmahait.gov.in/ संकेतस्थळावर तातडीने अर्ज दाखल करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस. रणदिवे यांनी केले आहे.

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजनांतर्गत सुक्ष्म सिंचन योजना ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी ९० टक्के अनुदान असल्याने योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

-------

भोकरदन तालुक्यातील 7 हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेतच

पिंपळगाव रेणुकाई

जिल्ह्यात पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना सुरू केली असली तरी भोकरदन तालुक्यात नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या तब्बल ७ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतिक्षा अद्याप कायम आहे. या योजनेत भोकरदन तालुक्यातील १२ हजार ६४७ शेतकऱ्यांचे सभासदांचे खाते बँकेने पोर्टलवर अपलोड केले आहे. त्यापेकी पहिल्या यादीत ५ हजार ४३० शेतकऱ्यांचे नावे आले आहे. यामध्ये ५ हजार २३१ शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण केले असुन ४ हजार ७२९ लाभार्थी शेतकऱ्यांना ११ कोटी ४४ लाख रुपये आली असल्याची माहीती सहाय्यक निबंधक कार्यालयातुन मिळाली आहे. राज्यात २०१४ पर्यंत पिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने सन २०१६ साली छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करुन कर्जमाफी केली. या योजनेतर्गंत तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. यानंतर सन २०१९ साली तत्कालीन आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर छञपती शिवाजी महाराज योजना बंद करुन महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना सुरू केली.या योजनेद्वारे देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना याच योजनेतर्गंत प्रोत्साहनपर म्हणून शासनाने ५० हजारापर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली. यात तालुक्यातील पहिल्या यादीत ४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या खात्यात अकरा कोटी ४४ लाख रुपये वितरीत करण्यात आले. या योजनेत बसणार्या एकुण १२ हजार ६४७ सभासंदाचे खाते बँकेने पोर्टलवर अपलोड केले. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवाश्यक होते, याबाबत प्रशासनानेही वारंवर आवाहन केले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांनी ते केले नाही त्यामुळे हे शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहीले आहेत.

तालुक्यातील १२ हजार ६४७ शेतकऱ्यांचे सभासदांचे खाते बँकेने पोर्टलवर अपलोड केले आहे. त्यापेकी पहिल्या यादीत ५ हजार ४३० शेतकऱ्यांचे नावे आले आहे. यामध्ये ५ हजार २३१ शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण केले असुन ४ हजार ७२९ लाभार्थी शेतकऱ्यांना ११ कोटी ४४ लाख रुपये आले असून यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा अगोदरच अतिवृष्टीच्या संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

शेतकरी कल्याणाचा योजना राबवताना अनेक शेतकरी हे गाफील राहतात किंवा त्यांना माहितीही मिळत नाही. त्यामुळे ख्रऱ्या गजरवंत शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचत नाही असा ग्रामीण भागात हमखास अनुभव येताे. त्यामुळे प्रशासनानेही याबाबत प्रभावी जनजागृती आणि विषेश शिबीरे आयोजित करण्याची आवश्यकता आहे.

जालना जिल्ह्यातील या संस्था असतील पात्र
प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या पहिल्या यादीत १२६४७ सभासंदाचे खाते बँकेने पोर्टलवर अपलोड केलेले आहेत. त्यापैकी ५ हजार ४३० शेतकऱ्यांचे नावे आले. त्यापैकी ५ हजार २३१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे.आणखी २०० शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिककरण करणे बाकी असल्याचे सहाय्यक निबंधक कार्यालयातुन देण्यात आले आहे.

बँकेच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
मी बँकेचा नियमित कर्जदार आहे. दरवर्षी मी वेळेच्या आता बँकेने दिलेल्या पिक कर्जाच्या पैशाचा व्याजासहीत भरणा करतो. माञ मला अद्यापही शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला नाही. सध्या पैशाची चणचण भासत आहे. याकडे वरिष्ठाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे शेतकरी गोपाल देशमुख म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...