आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जिल्ह्यातील शेतकरी गटांना औजार खरेदीसाठी अर्ज करण्याचे आवाहन; कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानव विकास जिल्हा स्पेसिफिक सन २०२१-२२ अंतर्गत अनु. जाती,जमातीच्या शेतकरी गट यांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी औजार बँक (स्वयंचलित रिपर, पॉवर विडर, ब्रश कटर) या तीन औजार खरेदीसाठी आत्मा कार्यालया अंतर्गत स्थापन करण्यात आलेले गरीबातील गरीब अनुसूचित जाती,जमातीच्या शेतकरी गटांना आधुनिक शेती औजारे संच ९० टक्के डीबीटी तत्त्वावर अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये अनुदानाची ९० टक्के रक्क्म डीबीटीद्वारे शेतकरी गटांच्या बँक खात्यात पूर्वसंमती व खरेदी झाल्यानंतर जमा करण्यात येईल.

लाभार्थ्यांचा हिस्सा १० टक्के रक्कम स्वत: शेतकरी गटांनी भरावी. प्रती आधुनिक मशिनरी व शेती औजारे संच किंमत ३ लाख ५० हजार प्रति लाभार्थी हिस्सा १० टक्के रक्कम ३५ हजार प्रती अर्थसहाय्य अनुदानाची ९० टक्के रक्कम ३ लाख १५ हजार आहे. तालुकानिहाय लक्षांक (गट संख्या) जालना -९,बदनापूर -१५, भोकरदन १५, परतुर १२, मंठा १२, अंबड १२, घनसावंगी १६ असे एकुण ९२ गट. गटांना अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...