आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँकेचा तपशील देण्याचे आवाहन

जळगाव सपकाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे व परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक खात्याची माहिती देण्याची आवाहन जळगाव सपकाळ सजाचे तलाठी पवार यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

जळगाव सपकाळचे तलाठी ए. एस. पवार यांनी म्हटले, आपल्या नावे जमीन असेल तर अशा शेतकरी बांधवांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स आणि त्यावर मोबाईल नंबर लिहून ते आधार कार्ड जळगाव सपकाळ तलाठी कार्यालयात दोन दिवसात जमा करावी अशा सूचना देण्यात आले आहेत. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. या अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून ज्या शेतकऱ्यांनी बँकेचा खाते नंबर दिलेला नाही अशा शेतकऱ्यांनी बँकेचे खाते क्रमांक,आयएफएससी कोड, मोबाईल नंबर, आधार कार्डची छायांकित प्रत तलाठी कार्यालयात जमा करावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ संपर्क करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...