आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सौर कृषिपंप बसविला जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना करार पद्धतीने शेतजमीन द्यावी लागणार आहे. त्याचा मोबदलाही मिळणार आहे. महावितरणच्या उपकेंद्रापासून पाच किलोमीटर अंतरात शेतजमिनीवर सोलर प्लेट उभारून दरदिवशी दोन मेगावॅट निर्मितीचा हा प्रकल्प आहे. ही वीज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातून गावोगावी वीज पुरवठा होईल. यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...