आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य - पॉवर २०४७’ कार्यक्रमांंतर्गत भोकरदर तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे ऊर्जा महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, महावितरणचे अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे, तहसीलदार कदम, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक प्रशांत मौदेकर, सरपंच भाऊसाहेब भुजंग यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या विविध संस्थांनी बनविलेल्या चित्रफिती दाखवण्यात आला, तसेच पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. आमदार कुचे यांनी ऊर्जा विभागाच्या कामगिरीचे कौतुक करून विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक डॉ. शिवाजी तिकांडे यांनी केले. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता भूषण पहुरकर, सोमनाथ मठपती, प्रशांत वाटपाडे, व्यवस्थापक सुनील मगरे, उपकार्यकारी अभियंता हनुमंत लोसरवार, दीपक तुरे पाटील, उपव्यवस्थापक गणेश डांगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, वीजग्राहक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.