आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी रोजी सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या काळानूसार शेतीमध्ये उच्च तंत्र व नवनवीन तंत्रज्ञान, संधी, व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आत्माचे प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी केले आहे. कृषी प्रदर्शनात ६०० पेक्षा जास्त स्टॉल्स, कृषी विद्यापीठांची दालने, विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्र प्रक्रिया उद्योगांचे विशेष सादरीकरण, परिसंवाद या निमित्ताने होणार आहे. सदरील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाच दिवस चालणार आहे.

बातम्या आणखी आहेत...