आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:संसाधन व्यक्तींची सेवा विविक्षित कामासाठी घेण्याकरिता अर्ज द्यावेत

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थींना पाठपुरावा /हाताळणी साहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची नामिका सूची तयार करावयाची आहे. त्यासाठी सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार थेट मुलाखती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घ्यावयाच्या आहेत. १० नोव्हेंबर रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बचत भवन मोतीबागेसमोर जालना येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले आहे.

शैक्षणिक अर्हता उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, अनुभव अन्न प्रक्रिया उद्योग, बँकिंग, अनुभव सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व प्रशिक्षणाचा अनुभव आहे अशा व्यक्ती, अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन/वृद्धी नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादांच्या गुणवत्तेची हमी अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भात ३ ते ५ वर्षाचा अनुभव संसाधन व्यक्तींना त्यांनी प्रत्येक लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळवून देण्याच्या दृष्टीने जे सहाय्य केले त्यानुसार मोबदला दिला जाईल संसाधन व्यक्तीस मंजुरीनंतर प्रती बँक कर्जासाठी २० हजार रुपये देण्यात येतील,

बातम्या आणखी आहेत...