आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:युवासेना जालना तालुका अध्यक्षपदी संदीप मगर यांची नियुक्ती

सिंधीकाळेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील राममुर्ती येथील संदीप मगर यांची शिवसेनेच्या युवासेना जालना तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती युवासेनेचेप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ही निवड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर सूचनेनुसार करण्यात आली.

यावेळी निवडीबद्दल बाला परदेशी, हरीहर शिंदे, सखाराम गिराम, सुभाष गिराम, विष्णुपंत गिराम, भागवत गिराम जनार्धन गिराम, गणेश गिराम, तुळशिराम गिराम,दिलीप गिराम यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली युवा वर्गाला सोबतघेऊन पक्ष वाढवण्याबरोबरच आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी मेहनत घेणार आहे असल्याचे मगर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...