आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक‎:उपसरपंच निवडीसाठी‎ निरीक्षकांच्या नियुक्त्या

मंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या‎ उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ४ ते‎ ६ जानेवारी अशा तीन टप्प्यात‎ निवडणूक होणार आहे. याकरिता‎ १४ निवडणूक निरीक्षक‎ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली‎ असल्याची माहिती तहसीलदार‎ कैलासचंद्र वाघमारे यांनी दिली.‎ मंठा तालुक्यातील निवडणुक‎ झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये चार‎ जानेवारी रोजी नवनिर्वाचित‎ सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पहिली‎ सभा घेऊन उपसरपंच निवडला‎ जाणार आहे.

सरपंच थेट जनतेतून‎ निवडून आल्यानंतर गावातील‎ दुसऱ्या क्रमांकाचे पद उपसरपंचाचे‎ मानले जाते. त्यामुळे उपसरपंच‎ पदाच्या निवडणुकीला गावात‎ महत्त्व प्राप्त झाले असुन उपसरपंच‎ पद प्राप्त करण्यासाठी गावात‎ निवडून आलेल्या ग्रामपंचायत‎ सदस्यांनी आता दंड थोपटले.असून‎ उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी‎ गुडघ्याला बाशिंग बांधून तयार‎ आहेत.‎ तालुक्यातील पस्तीस पैकी चार‎ ग्रामपंचायतीची सरपंच व‎ सदस्याची निवडणूक बिनविरोध‎ झाली आहे.

तर उस्वद येथे सर्व‎ सदस्य पदाची बिनविरोध निवड‎ झाली तर सरपंच पदाची निवडणूक‎ झाली आहे. या निवडणुकीत अनेक‎ ठिकाणी सरपंच एका पक्षाचा तर‎ सदस्य इतर पक्षाचे निवडून‎ आल्याने उपसरपंच पदाच्या‎ निवडणुकीस महत्त्व आले आहे.‎

आपल्याच पक्षाचा सरपंच याकरिता‎ ही निवडणूक चुरशीची होत आहे.‎ तसेच महिला नागरिकाचा मागास‎ प्रवर्ग, अनुसूचित जाती या‎ आरक्षणावर सरपंच पदाची‎ निवडणूक झाली त्या ठिकाणी‎ देखील उपसरपंच पदाकरिता‎ चुरशीची निवडणूक होत आहे.‎ प्रत्येक ठिकाणी उपसरपंच कोण‎ होणार आहे हे ठरले आहे. तरी‎ देखील विजयोत्सव, नव वर्षाचे‎ स्वागत व हौस म्हणून अनेक‎ ठिकाणचे नवनिर्वाचित‎ सरपंच,उपसरपंच पदाचा ठरलेला‎ उमेदवार व सदस्य धार्मिक व‎ पर्यटनस्थळी भ्रमंतीवर गेले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...