आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका जणांच्या मालकीच्या असल्या जागेवर अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे दोन गटांमध्ये वाद झाला. या ठिकाणी आलेल्या पोलिसांवर अंत्यसंस्कारासाठी रचण्यात आलेल्या सरणातील लाकडांनी पोलिसांना मारहाण केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिस नाईक रामदास केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे स्मशानभूमीत प्रेतावर अंत्यविधी करण्याच्या कारणावरून वाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती मिळाल्यावरून राऊत, मरळ, राठोड, पवार, गायकवाड, वैद्य यांचे पथक गेले होते.
मच्छींद्रनाथ चिचोली येथील घनसावंगी ते कुंभार पिंपळगाव रोडलगत बसस्टँड जवळील मोकळ्या जागेत तसेच रोडवर अंदाजे २०० लोकांचा जमाव हाेता व मोकळ्या जागेत एक महिला व एक माणूस बसलेला हाेता. त्या लाकडाच्या जवळच एक महिलेचे प्रेत जमिनीवर ठेवलेले पोलिसांना दिसले.
त्यावेळी पोलिस पथकाने लाकडावर असलेल्या व्यक्तीबाबत व इतर जमलेल्या लोकांकडे विचारपूस केली असता सरणावर बसलेला व्यक्ती दिसून आला. अंत्यविधीसाठी एका महिलेचा मृतदेह आणला होता. यात दोन्ही गटांत वाद होत असताना पोलिस त्यांची बाजू घेत आहे, त्यांना मारा असे म्हणत तेथील काही जणांनी सरणातील लाकडांनी पोलिसांना मारहाण केली. यात एक पोलिस जखमी झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.