आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर चोर जेरबंद:मंदिरातील घंटा चोरून नेणारे दोन चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिरातील घंटा चोरणारे दोन चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. १५ जून रोजी हसनाबाद हद्दीतील फिंप्री फाटा गणपती मंदिरातील घंटा चोरांनी चोरली होती. त्यावरून पोलीस स्टेशन हसणाबाद गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक पुराव्याच्या आधारे व गुप्त बातमी दारा मार्फतीने माहिती मिळाली की सदरचा गुन्हा अभिलेखा वरील सराईत आरोपी नामे बाबासाहेब नारायण वांगे उर्फ वांग्या (३३, संजय नगर जालना) याने त्याचा साथीदार नामे माधव उत्तम घाडगे (४०, लालबाग जालना) याच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधरारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे, एएसपी विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक प्रमोद बोंडले पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...