आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचे आगमन:स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच शिराळा गावामध्ये एसटीचे आगमन; बस येणे ग्रामस्थांसाठी एेतिहासिक क्षण

टेंभुर्णी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथे बससेवा नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांना प्रवासाची गैरसोय होत होती. सर्वांची पायपीट थांबावी यासाठी पालकांसह भाजप कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांच्याकडे बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर आमदार दानवे यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिराळा गावासाठी बस सेवा सुरू करण्याची सूचना केली.

त्यानंतर बुधवारी प्रत्यक्षात देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच लालपरीचे गावात आगमन झाले. हा क्षण ग्रामस्थांसाठी एेतिहासिक ठरला. ही बस सेवा सुरू केल्यामुळे गावातील नागरिकांनी देशाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब व आमदार संतोष दानवे यांचे आभार मानले. यावेळी चालक, वाहकाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उध्दव .दुनगहु, भिमराव शिराळकर, पांडुरंग दुनगहू, सरपंच निर्मलाबाई शिराळकर, बाबासाहेब दुनगहू, पंढरीनाथ शिराळकर, मधुकर दुनगहू, विष्णू दुनगहू, अवचितराव सरडे, अशोक गायकवाड, रामदास दुनगहु, प्रकाश दुनगहु, गणेशराव सरडे, गजानन शिराळकर, बाबासाहेब गायकवाड, संजय दुनगहू, कृष्णा दुनगहु, विठ्ठल गायकवाड, सूर्यभान शिराळकर, श्रीहरी दुनगहु, रावसाहेब दुनगहु, कृष्णा दुनगहु, शांताराम पाटोळे, लक्ष्मण दुनगहू, बबन दुनगहु, मनोज दुनगहु, संतोष पाटोळे, नारायण सरडे, अण्णा सरडे, ईश्वर ससाने, कैलास दुनगहू, अनंता शिराळकर, शेषराव मलवर, सुधाकर मलवर, मारोती पाटोळे, समाधान दुनगहु, राजु गायकवाड, रामकिसन गायकवाड, देवराव मलवर, बालु हिवाळे, अनंता दुनगहु, राजु हिवाळे, संदीप पिंपळे, शिवाजी पाटोळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...