आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन:संस्कार'च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे कला प्रदर्शन

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी सुटीत टाकाऊपासून अनेक टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूमध्ये आकाशकंदील, फुलदाणी, पेनस्टँड, बांगड्यांचे तोरण आणि विविध निसर्ग चित्रांचे प्रदर्शन शाळेच्या प्रांगणात भरविण्यात आले होते.

दिवाळीच्या सुट्टीत मुलांना दिवाळी गृहपाठाबरोबरच अडगळीत टाकून दिलेल्या वस्तूपासून आवडणारी वस्तू तयार करण्याचा उपक्रम देण्यात आला होता. शाळेतील २०० विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत. बांगड्यापासून तोरण कपड्यांपासून पायपुसणी, शोपीस, कापडी पिशवी कागदी बैलगाडी, फुलदाणी चलभाष उपकरण, बंदूक, आकाशकंदीलासह अनेक वस्तू मुलांनी बनविल्या आहेत.

मुलांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक ईश्वर वाघ यांनी केले. उपक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला आहे. शाळेतील मुलांनी निसर्ग चित्र विविध संतांचे रेखाचित्र असं कलात्मक रेखाटने काढली होती. यावेळी शाळेतील शिक्षक किरण धुळे, रेखा हिवाळे, शारदा दहिभाते, कीर्ती कागबट्टे, स्वप्नाजा खोत, अश्विनी काळे, रशीद तडवी, माणिक राठोड, शिक्षकेतर कर्मचारी पवन साळवे, नितेश काळे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख, प्रा.राम भाले, विनायकराव देशपांडे, प्रा. केशरसिंह बगेरिया आदींनी कौतुक केले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

चौदा वर्षांपासून उपक्रम
गेल्या १४ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, विद्यार्थ्यांमध्ये कार्यानुभव या माध्यमातून कलेची आवड निर्माण व्हावी आणि कोरोनाकाळात मंदावलेली लेखन क्षमता विकसित व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करत असतो. यामध्ये निबंध, कथा, वृत्तांतलेखन यासह दिवाळी गृहपाठ देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. रामदास कुलकर्णी, उपक्रमशील शिक्षक

बातम्या आणखी आहेत...