आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कलावंतांनी स्वत:च्या गुणवत्तेचे मूल्यांकन वाढवावे; सुनील रायठठ्ठा यांचे प्रतिपादन, आर यू व्हर्जिन नाटकास रसिकांकडून प्रतिसाद

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संकटकाळात जनजागृती, समाज प्रबोधनासाठी कलावंतांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले असून आपली कदर होत नाही, अशी खंत व्यक्त न करता आपण स्वतः मानसिकता तयार करावी आणि स्वतःचे प्रॉडक्ट व्हॅल्यू वाढवावे. असे आवाहन उद्योजक सुनीलभाई रायठठ्ठा यांनी केले.

पाडव्याच्या पूर्व संदेश शुक्रवारी जेईएस.महाविद्यालयाच्या खुल्या सभागृहात उत्कर्ष थिएटर्स निर्मित सतीश लिंगडे लिखित व दिग्दर्शित “आर यु व्हर्जिन “ या दोन अंकी नाट्य प्रयोगाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. संजीवनी तडेगावकर, भरत भांदरगे, प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, अनया अग्रवाल, सतीश लिंगडे यांची उपस्थिती होती. सुनील रायठठ्ठा पुढे म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात सर्वत्र भीतीचे वातावरण असतांना जालन्यातील कलावंतांनी एकत्र येत साकारलेल्या प्रबोधनपर लघुपटाचे प्रशासन, वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत झाले.

असे नमूद करत मराठी माणूस संपूर्ण विश्वात पसरलेला असून कलावंतांनी परदेशातील रसिक प्रेक्षकांवर लक्ष केंद्रित करावे ,असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी प्रतिभावंत नेहमीच प्रतिभेच्या जोरावर उत्कट कलाकृती निर्माण करतात. मराठवाड्यात चर्चा होत नसलेले अनेक विषय कलेच्या माध्यमातून सादर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी महाविद्यालयातर्फे आगामी काळात राज्य स्तरावरील कलेच्या क्षेत्रातील विविध स्पर्धा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला. भरत भांदरगे यांनी दबक्या आवाजात सुरू असलेली चर्चा नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लेखक, दिग्दर्शक सतीश लिंगडे यांनी नाटक म्हणजे लेकीचे लग्न असल्याचे नमूद केले. नटरंग व रंगमंच पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन सुमित शर्मा यांनी केले. कोरोना परिस्थितीनंतर होत असलेल्या नाटकास रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत कलावंतांना चांगली दाद दिली.

बातम्या आणखी आहेत...