आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाइल लहान मुलांसाठी घातक आहे, त्यांना मोबाइलचे व्यसन लागते. ते आपल्या लक्ष्यापासून दूर होतात. मुलांमध्ये मोबाइलमुळे बरेच आजार आढळून येत असल्याचे डॉ. प्रकाश आंबेकर यांनी सांगितले.महाराष्ट्र प्रदेश खाण्डल विप्र संगठन, शाखा सभा जालनाच्यावतीने आयोजित समाज प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किशन खंडेलवाल, कैलास खंडेलवाल, महेश खंडेलवाल, गौरी शंकरजी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. डॉ. आंबेकर म्हणाले, लहान वयात मुलांना चष्मा लागतो, ते शारिरीक खेळापासून दूर झाले आहेत.
त्यांना डोकेदुखीचा त्रास होतो, मुले चिडचिड करतात. तर पालकांनी त्यांना मोबाईल देऊ नये. परंतु आजच्या या युगात मोबाईल शिवाय शिक्षण ही अपुर्ण आहे, तरी मुलांना मोबाईल द्यावा लागतो तेव्हा त्यांना मोबाईल वापराची कालावधी पालकांनी ठरुन द्यावी, जेव्हा ते मोबाईलचा वापर करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यावे. तो त्यात काय बघतो याची माहिती पालकांना असलीच पाहिजे. आज माणसाची जागा मोबाईल, इंटरनेट यांनी घेतली आहे. आजच्या या सोशल मिडियाच्या युगात पालकांचे आपल्या मुला सोबत संवाद होत नाही, त्यामुळे मुले पण टि.व्ही., मोबाईल, लॅपटॉप इतर आधुनिक तंत्रज्ञानातच गुंतुन वाईट वाटचालीकडे अग्रेसर होत आहे. पालकांनी आपल्या मुलां सोबत संवाद साधलेच पाहिजे. त्यांना वेळ देणे हे काळाची गरज आहे.
एकतर पालकांनी आपल्या मुला-मुलींना रडु द्यावे, रडणे हे सुध्दा एक मानवीय चांगला गुण आहे, त्यामुळे फुफ्फुसाचे आजार टळतात, कोरोना होत नाही, असे सांगितले. पालक चार प्रकारचे असतात. कडक पालक, शिस्तीचे पालक, पोलिसां सारखे, एखाद्या कोर्टच्या जज सारखे किंवा डॉक्टरांसारखे. आपण या मधील कोणते पालक आहात, हे स्वतः ओळखले पाहिजे. मुलांचा वाढदिवस अनाथ आश्रम येथे साजरा करावा. त्यांना शेती मध्ये घेऊन जा, शेती कशी करतात? धान्य कसे उगविले जाते? असे प्रेरणात्मक प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्या ज्ञानात भर टाकावी. आपल्या मुलांना दुसऱ्या मुलांसोबत कॉम्पेरिजन करू नये.
त्यामुळे आपल्या मुलाच्या मनात कमीपणा येतो. पालकांनी मुलांच्या चुकावर त्यांना रागु नये, त्यांना मारु नये, या उलट त्यांना चुका सुधारण्याची ताकीद द्यावी, असे डॉ. आंबेकर म्हणाले. प्रा. सतीश खरटमल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी कैलास खंडेलवाल, उमेश खंडेलवाल, महेश खंडेलवाल, संतोष खंडेलवाल, विशाल खंडेलवाल, डॉ. नितीन खंडेलवाल, आरती खंडेलवाल, श्रेयश खंडेलवाल, संतोष खंडेलवाल आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.