आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासकार्य:फक्त एका अंगठ्याच्या ठशामुळे तब्बल 215 मृतांची पटेना अोळख

लहू गाढे | जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात मागील सात महिन्यांत जवळपास २१५ अनोळखी मृतदेह आढळले. पण अंगठ्याचा ठसा (थम्ब इम्प्रेशन) घेऊन आधार कार्डवरून माहिती घेण्याची पोलिसांना परवानगी नसल्याने अनेक मृतदेहांची ओळखच पटत नाही. परिणामी मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सोपवण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय स्तरावर आधार कार्डची माहिती घेऊन बेवारस मृतदेहांची ओळख पटवता यावी म्हणून पाठपुरावा सुरू आहे.

विविध राज्यांतून अनेक जण पोट भरण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जातात. तर शहरात भीक मागणाऱ्या लोकांची संख्याही अधिक आहे. तसेच अनेकदा काही वेळेस आरोपी काही जणांचे खून करून दुसऱ्या जिल्ह्यात आणून टाकण्याचेही प्रकार घडतात. सार्वजनिक ठिकाणी अथवा कुठेही मृतदेह दिसून आला की नागरिक पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती देतात. यानंतर पोलिस येऊन ओळख पटलेली असल्यास त्या मृतदेहाला नातेवाइकांच्या ताब्यात देतात. परंतु, ओळख पटली नाही तर काही दिवस हा मृतदेह शवगृहात ठेवला जातो. कुणीच न आल्यास कायदेशीर कारवाई पूर्ण करून पोलिसच पालिकेच्या मदतीने त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. अनोळखी मृतांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सतत सुरू असतात.

केंद्र स्तरावर मागणी
अनोळखी मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड अॅक्सेस करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. वरिष्ठांमार्फत याबाबतचा केंद्र स्तरापर्यंत पाठपुरावा सुरू आहे. अॅक्सेसमुळे काही वेळेअगोदर मृतदेहाचे थम्ब लावल्यानंतर सर्व माहिती मिळू शकते. याने तपास कामाला वेग येऊन अनोळखी मृतदेहांची संख्याही घटेल.
- राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलिस अधिकारी, अक्कलकोट, जि. सोलापूर.

संबंधित विभागाकडे पाठपुरावा
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथेरिटी ऑफ इंडिया या विभागाकडून (आधार विभाग) थम्ब घेण्याची परवानगी मिळणे गरजेचे आहे. यामुळे अनोळखी मृतदेहाची ओळख होऊन तपासाला वेग येईल, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने वरील विभागाची पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. हा अॅक्सिस मिळत नसल्याने मृतदेहांचे अंत्यसंस्कार परस्पर करावे लागतात. यासाठी लागणारा खर्चही पोलिसांना करावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...