आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जालना जिल्ह्यातील ६० खेळाडू खेळणार आहेत. ही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर, मुंबई व अमरावती या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. मुख्य स्पर्धेचे आयोजन श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्रात साधारणत: २२ वर्षांनंतर या स्पर्धा होत आहेत. राज्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा होतील.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या यांच्या वतीने आयोजित होणारी ही स्पर्धा राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेची व मानाची अशी स्पर्धा आहे. या स्पर्धामधून विशेषतः ग्रामीण भागातील नवनवीन खेळाडू क्रीडा स्पर्धाकडे आकर्षित होतील. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंची गुणवत्ता समोर येईल आणि प्रत्येक खेळाडूच्या मनामधील ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग घेण्याची धारणा व स्वप्न असते, ते स्वप्न साकारण्यासाठी पहिली पायरी म्हणजे ही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असेल.
या स्पर्धांमधून भविष्यातील दर्जेदार खेळाडू निर्माण होऊन राज्याच्या क्रीडा क्षेत्राला नवीन दिशा देण्याचे काम या स्पर्धेमधून निश्चितपणे होईल. स्पर्धेत खेळाडूंना सहभागी करण्यासाठी सर्व तालुका, जिल्हा क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, क्रीडा शिक्षक व सर्व क्रीडा शिक्षकांनी प्रेरित करावे, असे आवाहन तायक्वांदो असोसिएशनने केले आहे.
अकरा हजार क्रीडापटूंचा राहणार स्पर्धेमध्ये सहभाग
या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधून विविध ३९ क्रीडा प्रकारांतील सुमारे १० ते ११ हजार क्रीडापटू सहभाग घेणार आहेत. महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला एक नवीन आयाम व दिशा देण्याचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.