आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढ्याला यश:आ.गोरंट्याल यांनी इशारा देताच वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी ; महाजन यांनी केली घोषणा

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू होता. त्यातच सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आमदार कैलास गोरंट्याल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना १६ ऑगस्ट रोजी पत्र दिले होते. यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर न केल्यास विधिमंडळासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. आंदोलनाची तयारी सुरू असतानाच सरकारने जालन्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. आपण केलेल्या प्रदीर्घ पाठपुराव्याचे हे यश असल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळावी यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या या मागणीची दखल घेऊन राज्याचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने जालन्याला पाठवून मेडिकल कॉलेजसाठी इंदेवाडी आणि रेवगाव येथे जागेची पाहणी करून तसा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता. याशिवाय राज्याचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्वतः जालना येथे भेट देऊन मेडिकल कॉलेजसाठी उपलब्ध करून दिलेल्या नियोजित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी आवश्यक २५ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. मात्र अहवाल सादर करण्यात आल्यानंतरही जालना येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ करण्यात आल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार कैलास गोरंटयाल यांनी मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळावी यासाठी अत्यंत आक्रमक भूमिका घेत हा मुद्दा लावून धरला होता. त्यातच सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आमदार गोरंट्याल यांनी मंत्री महाजन यांना उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.

कुंबेफळ शिवारात ३६ हेक्टर जागा
अंबड रोडवर कुंबेफळ शिवारात ३६ हेक्टर शासकीय जमीन आहे. प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयासाठी दहा हेक्टर एवढी जागा आवश्यक आहे. त्यामुळे ही जागा सहज उपलब्ध होऊ शकते. दरम्यान, मोजणी करून ही जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन पर्याय
शासनाला तातडीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावयाचे झाल्यास सध्या कार्यरत असलेल्या २३ एकर क्षेत्रावरील जिल्हा रुग्णालय परिसरातही होऊ शकते. प्रवेशित विद्यार्थ्यांचे थिअरी वर्ग व त्यानंतर प्रात्यक्षिकासाठी जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयात रुग्णसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. शिवाय, जिल्हा रुग्णालयालगत उत्तरेस ५ व दक्षिणेस ५ अशी दहा एकर मोकळी जमीन आहे. मेंटल हॉस्पिटलची ६ एकर जागा आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय व परिसरातील शासकीय जमिनीवर वैद्यकीय महाविद्यालय करता येऊ शकते. खर्चाचा विचार करता यातून शासनाचे कोट्यवधी रुपये वाचू शकतात. तर रुग्णांना जिल्हा रुग्णालयाबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य सुविधा मिळू शकतील.

श्हरातील चौथे महाविद्यालय
बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे गुरुमिश्री होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, वरुडी येथे जामिया इस्लामिया इशातुल उलूम अँड रिसर्च सेंटर(जेआयआयू अँड रिसर्च सेंटर), जालना तालुक्यातील रोहनवाडी शिवारात डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. आता हे चौथे वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे.

संघर्षाला आले यश
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही मी यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवला. चार दिवसांपूर्वीच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना पत्र देऊन विधिमंडळासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. आता सरकारने हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याने राज्य सरकारचे समस्त जालनेकरांच्या वतीने आभार.
कैलास गोरंट्याल,आमदार

बातम्या आणखी आहेत...