आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातायक्वांदो या खेळामुळे सर्वांगीण व्यायाम होतो. हा खेळ अधिकृत असल्याने पोलीस भरती, संरक्षण विभाग, केंद्रीय व राज्य सरकारच्या शासकीय नोकरीत विशेष सवलती मिळतात. प्रत्येकाने आरोग्यासाठी खेळाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कदिम जालना ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. ए. सय्यद यांनी येथे केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना व तायक्वांदो असोसिएशन जालना डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय लाखे तर प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, जगन्नाथ काकडे, तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शेख हबीब, फईम खान, विकास सूर्यवंशी, रमेश जाधव, राज्य शुल्क उत्पादन विभागाचे विजय पवार, क्रीडा मार्गदर्शक नवनाथ गायकवाड, राष्ट्रीय पंच तथा असोसिएशनचे सचिव सचिन आर्य यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती.
सय्यद म्हणाले, पालकांनी आजच्या काळात अभ्यासाबरोबरच आपपाल्यांचे छंद कसे जोपासता येतील याकडे विशेष लक्ष द्यावे. आजच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तायक्वांदोचे चांगल्या प्रकारे प्रदर्शन करून अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले प्रशिक्षण सार्थ ठरविले. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास होतो, असे सांगितले. यावेळी डॉ. संजय लाखे पाटील, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख यांच्यासह आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत पंच म्हणून मयूर पिवळ, सचिन गादेवाड, ज्ञानेश्वर मोरे, सुजन हातागळे, वैष्णवी पळसकर, कोमल गायकवाड, मयुरी राठी यांनी काम पाहिले. स्पर्धेत जिल्हाभरातून ८५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत विजयी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सदरील स्पर्धा यशस्वीतेसाठी राहुल ढाकणे, गौतम वाघमारे, मोहम्मद यासीन आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आर्य यांनी तर आभार फईम खान यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.