आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्राशन:पाेलिसांनी लक्ष न दिल्यामुळे शेतकऱ्याने प्राशन केले विष

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतःच्या शेतात जाण्यास मज्जाव करून शेता शेजारील काही जणांनी शेतकऱ्यास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अंबड तालुक्यातील रूई येथे घडली. दरम्यान, मारहाण हाेऊनही पाेलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्याने रविवारी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्यावर जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अंबड तालुक्यातील रूई येथील शरद नानाभाऊ भगत या शेतकऱ्याची शेती असून १७ ऑगस्ट रोजी तो शेतात जात असताना शेताच्या शेजारी राहणारे कोंडिबा भगत, गणेश भगत, तुकाराम भगत यांनी शरद यास अडवून सदरील शेत आमचे असून तू शेतात पाय ठेवायचा नाही असे म्हणून मारहाण करत असतानाच काहींनी भांडण सोडवले. दरम्यान, तुकाराम भगत याचे अंबड येथील जावई गजानन धाईत यांनी फोनवरून शरद यास जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहे. याप्रकरणी शरद यांनी यापूर्वीही गोंदी पोलिस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी देऊन देखील पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेवटी हताश झालेल्या शरद भगत यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शरद भगत यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...