आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाच्या उत्पादनांमध्ये घट होत आहे. त्यातही उरला सुरला कापूस हाती आला तरी कपाशीचे दर देखील सातत्याने कमी होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मंठा तालुक्यामध्ये यावर्षी २३ हजार ३७७ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात असल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.
यासह मंठा बाजारपेठेमध्ये आज घडीला १२ हजार ९०४ क्विंटल कापसाची आवक झाली असुन कापसाला ७ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल असा दर दिला जात आहे. मागील वर्षी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त भाव मिळाला होता.त्यामुळे यंदा कपाशीची लागवड वाढली खरीप हंगामापासूनच कपाशीच्या लागवडीपासूनच अतिवृष्टीसह विविध रोगराईच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पन्नामध्ये घट होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
त्यात पुन्हा कपाशीचे दर सतत घटत असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत दिसून येत आहेत. मागील महिन्याच्या तुलनेमध्ये २ हजार ७०० पर्यंत दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत दिसून येत असुन कापसाचे दर घसरत असल्याने शेतकरी आता कापूस साठवणुकीवर भर देताना दिसुन येत आहे. मंठा शहरातील बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरामध्ये सातत्याने घट होत असल्याने मंठा बाजारपेठेतील कापसाची आवक घटली आहे. मागील वर्षी कापसाला प्रतिक्विंटल ११ हजार रूपयांच्या पुढे दर मिळाला होता. त्यामुळे यंदा कपाशीची लागवड केली आहे. परंतू यावर्षी कापसाचे दर घसरत असल्याने उत्पनापेक्षा लागवडीचा खर्च अधिक झाला आहे.
लागवड, फवारणी, वेचणी यासह इतर खर्च जास्त झाला आहे. त्यात कपाशीवर लाल्या, बोंडअळीसह करपा रोग आल्याने उत्पादनामध्ये घट येत आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा असल्याचे गेवराई येथील कापूस उत्पादक शेतकरी शरद खरात यांनी व्यक्त केली. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरु असल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत.
.बाजारपेठेत दिवसेंदिवस आवक घटू लागली
मंठा बाजारपेठेत १२ हजार ९०४ क्विंटल कापसाची आवक झाली आहे.तर कापसाचे दर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवातीला ९ हजार २०० रुपये प्रति क्विंटल कापसाचे दर होते. त्यात पुन्हा ८ हजार २०० रुपये प्रति क्विंटल असा दर झाला , त्यामुळे शेतकऱ्यांना भाववाढीची मोठी प्रतिक्षा आहे. महिन्यामध्ये आज घडीला ७ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल असा दर असल्याचे बाजार समितीचे सचिव एस. एम. छनवाल म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.