आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:आष्टीच्या ठाण्यातील पोलिसांची चौकशी करा

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी पोलिस ठाण्याचे एपीआय व अन्य काही कर्मचाऱ्यांनी तक्रार देण्यासाठी गेलेल्यांना मारहाण केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याबाबत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथे दोन गटांमध्ये वाद झालेला आहे. या वादातून पोलीस ठाण्यांमध्ये एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शेतीवादातून एका कुटुंबाच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. यामुळे या कुटुंबीयांनी आष्टी पोलिस ठाण्यात दुसऱ्या गटाविरुद्ध तक्रार दिली आहे. परंतु, पोलिसांनी विनापरवानगी काही जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी काही जणांना मारहाण करण्यात आली याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेतून निलंबित करण्यात यावे, नसता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर ओमप्रकाश चितळकर, सचिन खरात, बाबा आटोळे, श्रीराम हुसे आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...