आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजी महाराज उद्यान ते मोर बंगल्यापर्यंत १०.५० मीटर रुंद व ६०० मीटर लांब रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले अाहे. महिनाभरात हे काम पूर्णत्वास येऊन रहदारीस रस्ता खुला होणार आहे. नगरोत्थान योजनेंतर्गत होणाऱ्या या कामावर ९६ लाख ६८ हजार ९०० रुपयांचा खर्च होत आहे.
जालना शहरात प्रवेश करण्याचा व बाहेर पडण्याचा प्रमुख मार्ग असलेल्या या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. या मार्गावर पंचायत समिती कार्यालय, कामगार न्यायालय, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय, अँटिकरप्शन ब्युरोसह शासकीय निवासस्थाने असून कचेरी रोड, शनिमंदिर, गांधी चमनपर्यंत मोठी वर्दळ असते. तसेच रेल्वेस्थानक येथील धान्य गोदामातून रेशनचे धान्य घेऊन जाणारे ट्रकही मुक्तेश्वरद्वारजवळून या मार्गाने धावतात, तर एमआयडीसीसह परगावी कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची नागरिकांची मागणी होती.
गुणवत्तापूर्ण काम व्हावे एवढीच अपेक्षा
सदरील रस्ता अत्यंत वर्दळीचा असून गुणवत्तापूर्ण काम व्हावे एवढीच अपेक्षा आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी असो की महिला, वृद्धांसह सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून दीर्घकाळ टिकेल अशा पद्धतीने हे काम करण्यात यावे. तसेच नगरपालिका मुख्याधिकारी, अभियंता व प्रशासकांनी यात लक्ष घालावे.
-काशीनाथ मगरे, माजी नगरसेवक, जालना
रस्ता कामाला भेट देऊन कंत्राटदाराला सूचना
या शाळा-महाविद्यालये असून नागरिकांना शहरात ये-जा करण्याचा हा प्रमुख मार्ग आहे. या कामाला भेट देत दर्जेदार काम करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला दिल्या आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीच तडजोड केली जाणार नाही, कामावर लक्ष असेल. सय्यद सऊद, शहर अभियंता, न.प., जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.