आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करा

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे पोळा सणापासूल दोन समाजातील काही कुटूंबामध्ये वाद झालेला आहे. या वादाला धार्मीक रंग देऊन सामाजिक सलोखा बिघडविण्याचा काही जणांकडून प्रयत्न होत आहे. दरम्यान, पाेलिसांनी दोन्ही गटांवर समान कार्यवाही केलेली आहे. या प्रकरणात काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कंट्रोलला अटॅच करण्यात आले आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा ठाण्यात रुजू करावे, नसता १३ डिसेंबर रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २४ गावांतील २ हजार ५०० नागरिकांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

कोकाटे हदगाव येथील प्रकरणात पोलिसांकडून झालेल्या मारहाणीच्या कथीत ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. पोलिसांनी समान कारवाई केलेली आहे. परंतू, या घटनेला वारंवार जातीय वळण देणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, पोलीस अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेबद्दल त्यांना समज देण्यात यावी, पोलिसांचे मनौधैर्य उंचावण्यासाठी सदरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा आष्टी ठाण्यात पुर्ववत रुजू करावे, सदरील घटनेची चौकशी डिवायएसपी राजू मोरे यांच्या मार्फत न करता उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमार्फत करावी, अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी स्विकारले आहे. निवेदनावर विक्रमराजे तौर, सिध्देश्वर सोळंके, योगेश ढवळे, प्रदीप ढवळे, आनंद ढवळे, बाळासाहेब ढवळे, किरण शिभेदार, पवन परतूरकर, भागवत ढवळे, मंजूदास सोळंके, विकास खुळे, सचिन लिपणे आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...