आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:जळगाव सपकाळ येथे एक गाव एक गणपती ची परंपरा कायम ; विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव सपकाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे मागील कित्येक वर्षापासून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना आजही कायम आहे. गावात शांतता सामाजिक सलोखा कायम राहावा, सामाजिक व विधायक कार्यक्रम हाती घ्यावे या दृष्टिकोनातून एक गाव एक गणपती ही संकल्पना पुढे आली. तत्कालीन आमदार विठ्ठलराव सपकाळ यांनी १९७७ साली आपल्या जळगाव सपकाळ या गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवली. १९७७ साली पहिल्या वेळेस आमदार झालेले विठ्ठल सपकाळ यांनी आपल्या जळगाव सपकाळ गावात तत्कालीन प्रतिष्ठित ग्रामस्थ व त्यांचे सहकारी रामराव सपकाळ, हिम्मतराव पाटील, भिकनराव पोलिस पाटील, प्रल्हाद गुरुजी, पुरुषोत्तम बिडवई, पांडेबा कुलकर्णी, बाबुराव सपकाळ, गणपतराव सपकाळ, साहेबराव सपकाळ यांच्यासह ग्रामस्थांना एकत्र करून गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना सुरू केली. ग्रामपंचायतीच्या सभाग्रहात गणेश स्थापना करुन उत्सव सुरू केला.

त्याकाळात गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक शैक्षणिक महत्त्व पटवून देणारे कार्यक्रमही करण्यात आले. गावातील जेष्ठ नागरिक परिसरातील ग्रामस्थ व तरुण युवकांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले. गावचे सरपंच ते भारतीय जनता पक्षाचे दोनदा आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास. त्यांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे सलग दोन वर्षापासून साधेपणाने साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी धुमधडाक्यात साजरा होत आहे. दररोज गावातील एका दाम्पत्याच्या हस्ते श्रीगणेशाची महाआरती करण्यात येते. यावर्षी विविध कार्यक्रम होत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गोकुळ सपकाळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...