आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांडपाणी:पिंपळगाव रेणुकाई येथे नालीतील सांडपाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये

पिंपळगाव रेणुकाई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील पालखी मार्गावरील प्रभाग एकमधील नालीतील सांडपाणी थेट ग्रामस्थांच्या घरात शिरत आहे. यामुळे ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहे. शिवाय सदर सांडपाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून, या पाण्याचा प्रचंड उग्रवास येत आहे.त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करुन देखील याकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याने ग्रामस्थांकडून मोठा संताप व्यक्त केल्या जात आहे.दरम्यान, सहनशीलता संपली असल्याने येथील ग्रामस्थांनी रविवारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी नेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव मोठी बाजारपेठ व दाट लोकसंख्या असलेले गाव आहे. सध्या गावात सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे.अशातच प्रभाग एक मधील ग्रामस्थांना माञ नालीतील सांडपाणी घरात शिरत असल्याने विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.मागील तीन ते चार दिवसापासून परिसरात धुव्वाधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे नाली अंरुद असल्यामुळे नालीतील सांडपाणी थेट या भागातील ग्रामस्थांच्या घरात शिरते.यामूळे मोठी ताराबंळ महिला व पूरुषांची यावेळी उडते.शिवाय या ठिकाणील ढाफे देखील तुटलेल्या अवस्थेत असल्याने राञी-बेराञी या रस्त्यावरुन प्रवास करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान या ठिकाणी नालीत तुंबलेल्या सांडपाण्याचा प्रचंड उग्रवास सुटला आहे.

या उग्रवासाने या भागातील ग्रामस्थांचे जगणे मुश्कील झाले आहे.सदर पाण्यात डांसाचा उपद्रव वाढला असल्याने घरातील लहान-मुले, अबाल वृद्ध यांच्यामध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांना दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.सध्या गणपती उत्सव असल्याने गावात सर्वञ मोठा उत्साह निर्माण झाला आहे.पंरतु गावात ठिकठिकाणी सध्या घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने त्याचा नाहक ञास गणेश भक्तांना देखील सहन करावा लागत आहे.याबाबत ग्रामपंचायतीडे वारंवार तक्रारी करुन देखील काहीच उपयोग होत नसल्याने ग्रामस्थाकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.याकडे वरिष्ठाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जाहीरनाम्याचा ग्रा.पं.ला विसर : पिंपळगाव रेणुकाई येथे तब्बल पंधरा ते विस वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. यापूर्वी गावात भरघोस अशी विकासकामे देखील झाली आहे.पंरतु येथील ग्रामस्थांना दिड वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या सत्तेत असलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांंनी गगनभेदी आश्वासन देऊन सत्ता मिळवली खरी परंतु त्यांना आता निवडणूकी दरम्यान ग्रामस्थांना दिलेल्या ठळक जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. ग्रामस्थांनी जाहीरानाम्या संदर्भात विचारणा केली ग्रामपंचायत पदाधिकार्याकडून उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारुन नेल्या जात आहे.त्यामुळे जाने कहा गये वो दिन असे म्हणण्याची वेळ पिंपळगावकरांवर येऊन ठेपली आहे.

तक्रारींकडे ग्रा.पं.चे दुर्लक्ष
सांडपाणी थेट माझ्या घरात शिरत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पाण्याचा प्रचंड उग्रवास सुटला आहे. यामुळे डासांचा उपद्रव वाढला असुन घरातील सदस्यांना आजाराला निमंत्रण मिळत आहे.ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करुन देखील काहीच उपयोग होत नसल्याने तक्रारी करुन आता दमलो आहे. आता लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागणार आहे. रामेश्वर देशमुख, ग्रामस्थ, प्रभाग एक

बातम्या आणखी आहेत...