आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या हस्ते ; 380 बांधकाम कामगारांना सेफ्टी किटचे वाटप

भोकरदन21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील कामगारांना राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या हस्ते सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयामध्ये माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार मेळावा घेण्यात आला. सदर कामगार मेळावा हा राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेचा लाभ मतदारसंघातील शेवटच्या कामगारांपर्यंत तसेच सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचला पाहिजे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता.

दानवे यांनी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असल्याने या राज्यशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचल्या पाहिजे. या दृष्टीने ३८० कामगारांना उपयुक्त अशा सेफ्टी किटच्या पेट्यांचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी जाफराबाद तालुक्याचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, संग्रामराजे देशमुख, प्रा.अंकुश जाधव, वंदना हजारे, सुनीता सावंत, नसीम पठाण, रघुनाथ पंडित, नितीन शिवणकर, रामदास रोडे, शमीम मिर्झा, दिलीप पालकर, विजय मिरकर, दादाराव साबळे, अमोल शेळके, आसिफ शेख, विनोद चव्हाण, सचिन अवकाळे, शंकर बुजाडे, सुरेश मुरकुटे, के. एम. पंडित, रामचंद्र तेलंग्रे, एकनाथ शेवत्रे, दत्तू पा. अंभोरे, संतोष माऊली अंभोरे, विनोद खेडेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...