आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Jalna
  • Attempted Suicide By Consuming Poison In Court | Jalna News ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

उद्रेक:न्यायालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; ​​​​​​​शेतीच्या वादाचा निकाल लागत नसल्याने कृत्य

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादाचा निकाल लागत नसल्याने वारंवार न्यायालयात यावे लागत असल्यामुळे राजू माणिकराव मिसाळ यांनी न्यायदान कक्षातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना भोकरदन येथील न्यायालयात मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने भोकरदन येथील न्यायालयात फौजदारी खटल्याचे काम चालू आहे. भोकरदन दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायाधीश रोहिणी पाटील यांच्यासमोर खटला सुरू असताना सरकारी वकील हे त्या फिर्यादी राजू माणिकराव मिसाळ यांचा कक्षात जबाब घेत होते. यावेळी त्याने सर्वांसमोरच विषारी औषध प्राशन केले.

फिर्यादीचे जवाब नोंदवणाऱ्या सरकारी वकील वानखेडे यांना काही समजण्याच्या आत फिर्यादीने खिशातून औषधाची बाटली काढून औषध प्राशन केले. त्याच्या तोंडातून फेस आला असता सरकारी वकील तत्काळ बाहेर पळत आल्या. व पोलिसांना पाचारण केले. ड्युटीवरील पोलिसांनी त्यांना प्रथमोपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विलंबाच्या प्रकरणाला मी कंटाळून हे अखेरचे पाऊल उचलले. माझे जीवन पूर्णपणे या खटल्याने उद्ध्वस्त झाल्यामुळे मी नाईलाजाने जीवन संपवत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.