आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:भावाला ताब्यात घेतल्याने‎ एकाचा आत्महत्येचा प्रयत्न‎

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎एका गुन्ह्यात भावाला अटक का‎ केली, असे म्हणून एकाने पोलिस‎ चौकीसमोर डोक्यावर ब्लेडने वार‎ करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न‎ केल्याची घटना जालना शहरातील‎ रामनगर येथे बुधवारी घडली.‎ पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न‎ करणारा सुमित उर्फ गोलू राजू भुरे‎ (रा. रामनगर) याला ताब्यात‎ घेतले आहे. सुमित ऊर्फ गोलू राजू‎ भुरे याच्या भावावर सदर बाजार‎ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल‎ आहे.

या गुन्ह्यात त्याला ताब्यात‎ घेण्यासाठी सदर बाजार पोलीस‎ ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक‎ भगवान नरोडे हे गेले होते.‎ त्याचवेळी सुमित उर्फ गोलू‎ राजू भुरे याने माझ्या भावाला‎ ताब्यात का घेता, असे म्हणून‎ रामनगर येथील पोलीस‎ चौकीसमोर येऊन डोक्यावर‎ ब्लेडने वार केले. तेवढ्यात पोलिस‎ त्याला पकडण्यासाठी गेले असता,‎ त्याने तेथून पळ काढला. काही‎ वेळानंतर सुमित ऊर्फ गोलू राजू‎ भुरे हा सदर बाजार पोलीस‎ ठाण्यात आला.

त्याला पोलिसांनी‎ ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल‎ केले. या प्रकरणी भगवान नरोडे‎ यांच्या फिर्यादीवरून संशयित‎ सुमित उर्फ गोलू राजू भुरे‎ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे. या घटनेमुळे जालना‎ शहरात खळबळ उडाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...