आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:अंबड तहसील कार्यालय परिसरात चोरीचा प्रयत्न

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहसील कार्यालयात जप्त केलेल्या ट्रँक्टरचे स्पेअर पार्ट चोरी करण्याच्या हेतूने ट्रँक्टरचेमहत्वाचे स्पेअर पार्ट चोरी करून नेत असतांना एका चोरी करणाऱ्या व्यक्तीस पकडले होते मात्र तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्या कर्मचाऱ्याने सदर व्यक्तीस कडले व त्याच्याकडून ट्रँक्टरचे स्पेअर पार्ट हस्तगत केले मात्र या चोरट्यास कारवाई न करता सोडून देण्यात आले.

जर अश्या तहसीलच्या आवारात गौणखनिज वाहतूक प्रकरणातील वाहने तहसील परिसरात असुन यापैकी असलेल्या ट्रँक्टरचे स्पेअर पार्ट चोरी करून ते इतरत्र विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचे समजते.हे पकडलेले वाहने महिनो महिने पडून असते याचा फायदा घेत चोरटे या वाहनावर नजर ठेवून त्या वाहनाचे पार्ट चोरी करून विक्री करतात मात्र यावर तहसील मधील कुणाचीतरी मदत होत असल्याचे ही बोलले जाते कारण तहसील आवारात येऊन चोरी करण्याची हिंमत होऊच शकत नाही अशी चर्चा तहसील परिसरात होत होती.

याबाबत कुणीही बोलायला तयार नाही मात्र चोराने चोरीच्या उद्देशाने काढलेले ट्रँक्टरचे स्पेअर पार्ट तहसील कार्यालयात ठेवण्यात आले आहे.काही दिवसापासून तहसील कार्यालयातील सी.सी.टीव्ही यंत्रणा बंद असल्याची माहिती सुत्राकडुन मिळाली गेल्या महिन्यात तहसील परिसरातून दुचाकी चोरीला गेली होती.दिवसभर शेकडो लोकांचा वावर असतो .तहसील कार्यालयात झालेल्या या प्रकारामुळे यंत्रनेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.प्रभारी तहसीलदार गौरव खैरणार यांनी या प्रकरणाची चौकशी करुन वेगवेगळ्या प्रकरणात जप्त केलेल्या वाहनांच्या आढावा घेण्यात यावा तसेच सी.सी.टीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणातील बहुतेक वाहने तहसील परिसरात असुन यापैकी असलेल्या ट्रँक्टरचे स्पेअर पार्ट काढण्यात आल्याचे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...