आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्टिमेटम:विराट रॅली काढून मराठा आरक्षणासाठी सरकारला 7 ऑगस्टचा अल्टिमेटम

प्रतिनिधी | जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने मराठा आरक्षण ७ आगस्टपर्यंत जाहीर करावे म्हणून भांबेरी (ता. अंबड) येथे सोमवारी विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या पूर्वतयारी रॅलीसाठी भांबेरीत मराठा समाजाचा जनसागर लोटला होता. या वेळी सरकारने जर ७ आगस्टपर्यंत मराठा आरक्षणाबाबत आणि निवेदनावरील सर्व मागण्या मंजूर केल्या नाहीत तर ८ आॕगस्टपासून भांबेरीत मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

भांबेरीतील हजारो महिला, तरुण, तरुणी, पुरुष आपआपल्या बैलगाड्या, मोटारसायकल, कार घेऊन या विराट रॅलीत सहभागी झाले होते. मराठा आरक्षण लढ्याचे भगवे निशाण गावातील हजारो महिला, मुलींच्या हस्ते फडकवून, भांबेरी गावकऱ्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर केले जात नाही तोपर्यंत माघार नाहीच असा इशाराच सरकारला भांबेरी गावातील महिला, मुली, तरुण, पुरुष मंडळीने दिला आहे. सरकारने भांबेरी गावकऱ्यांनी दिलेल्या मागण्या ७ आॅगस्टच्या आत तातडीने मंजूर कराव्यात अन्यथा ८ गस्टपासून भांबेरी गावात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. या आंदोलनात संपूर्ण गावच सहभागी होणार आहे व परिसरातील गावेही हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...