आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:औरंगाबाद विभागीय ज्युनियर व्हॉलीबॉल निवड चाचणीचे आयोजन

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेच्या वतीने ज्यूनियर (१८ वर्षांखालील) मुले व मुली या गटाच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे स्पर्धेकरिता औरंगाबाद विभागीय ज्युनिअर निवड चाचणी स्पर्धा रविवारी १३ नोव्हेंबर रोजी भारतीय खेळ प्राधीकरण (साई सेंटर औरंगाबाद) येथे आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणी स्पर्धेला जास्तीत खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सचिव अर्शद काझी वऔरंगाबद जिल्हा सचिव सतिश पाठक यांनी केले आहे.

या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २००४ किंवा त्या नंतरचा असावा. जन्म पुराव्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विहित नमुन्यांमध्ये इंग्रजी व मराठी मध्ये असलेल्या किंवा एस. एस .सी बोर्डाचे जन्म तारखेची नोंद असलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जन्म प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.स्पर्धेकरिता औरंगाबाद विभागातील औरंगाबाद,जालना, परभणी, हिंगोली येथील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...