आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ दिवस नऊ नवदुर्गांचे विचार अन् पूजन उपक्रम:सखींचे मधुरांगण महिला ग्रुपतर्फे स्त्री जाणिवांच्या विचारांचा जागर

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ‘सखींचे मधुरांगण’ महिला ग्रुपतर्फे नवरात्रीनिमित्त स्त्री जाणिवांच्या प्रेरणा आणि विचारधारा जोपासणाऱ्या नऊ दिवस महिलांच्या विचारांचा जागर मांडण्यात येत आहे. या उपक्रमात शनिवारी अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालयात ७० मुलींना शैक्षणिक साहित्यासह पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आला. शहरातील शिवनगर परिसरातील अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालयात शाळेतील सहशिक्षिका शुभांगी लामधाडे यांनी विद्यार्थिनींसाठी नवरात्री निमित्त नऊ दिवस नऊ ‘महान स्त्री चरित्राचा’ कार्य गौरव हा उपक्रम राबविला आहे.

शालेय मुलींना नवरात्रीनिमित्त अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बहिणाबाई चौधरी, कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील, सिंधूताई सपकाळ, भारतरत्न लता मंगेशकर महान स्त्री चरित्रांची यशोगाथा वर्णन करण्यात आली. उपक्रमामुळे या नवदुर्गांच्या गुणांची ओळख विद्यार्थींनीना करून देण्यात आली. कार्यक्रमास सखींचे मधुरांगण ग्रुपच्या प्रमुख आरती सदाव्रते, अर्चना वासडीकर, धनश्री कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना आरती सदाव्रते यांनी मुलींना वाचनाचा छंद जोपासण्याचा सल्ला दिला.

अर्चना वासडीकर यांनी नवरात्री उत्सव साजरा करण्यामागील शास्त्र समजावून सांगितले. धनश्री कुलकर्णी यांनी वक्तृत्व विकसित करण्याचा सल्ला दिला. शाळेत सखींचे मधुरांगण ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य व पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आला.या वेळी पोषण आहार बनवणाऱ्या सुमन त्रिभुवन यांचा साडी चोळी देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा शोभा येवले, मुख्याध्यापिका स्वाती इंगळे, मीरा खवले, शारदा सद्गुरे,शुभांगी लामधाडे, शीतल येवले,दुर्गा घुले, सुमन त्रिभुवन यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...